मुंबई, 21 जानेवारी- बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’Souza) याचा मेव्हणा (Brother in Law) जॅसन वॉटकिंस (Jason Watkins) आपल्याच घरात मृतावस्थेत आढळला होता.ही माहिती समोर येताच खळबळ उडाली होती. परंतु आज या घटनेचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. रेमोची पत्नी लिजेलने (Lizelle D’Souza) याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक मोठी बाब समोर आली आहे. रेमो डिसूझा यांची पत्नी लिजेल यांनी मोठा खुलासा करत सांगितलं आहे, ’ जॅसनला गांजाचं व्यसन लागलं होतं. तीन वर्षांपूर्वी आपल्या आईचं निधन झाल्याचं लिजेल यांनी सांगितलं. आईच्या निधनाने आपला भाऊ जॅसनला मोठा मानसिक धक्का बसला होता. असा खुलासा त्यांनी केला आहे. आईच्या निधनानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. त्याने लग्नसुद्धा केलेलं नव्हतं. तो माझ्या आईच्या सर्वात जवळ होता. परंतु आईच्या जाण्याने तो पूर्णपणे नैराश्यात गेला होता. याच दरम्यान त्याला गांज्याचं व्यसन जडलं होतं. त्याने याच नशेत आत्महत्या केली असावी असा खुलासा लिजेलने केला आहे. जॅसननेदेखील चित्रपट क्षेत्रात काम केलं होतं. तो रेमोची चित्रपटं असिस्ट करीत होता. आपल्या भावाच्या निधनाने रेमोच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे. लिजेल डिसूजा हिन इंस्टा पोस्ट करीत भावाचा फोटो शेअर केला आहे.ईटाइम्सच्या बातमीनुसार, जॅसन मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला. मेडिकल अधिकाऱ्याने सांगितलं की, जॅसनला कूपर रुग्णालयात आणण्यात आले होते. आपल्या भावाच्या अचानक झालेल्या निधनामुळे रेमोच्या पत्नीला स्वत:ला सावरण कठीण झालं आहे. रेमो डिसूजाची पत्नी लिजेलने भावासोबतचा लहानपणीचा फोटो इंस्टावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये जॅसन रिक्षात आपल्या आईसोबत बसले आहेत.लिजेलने त्याची माफी मागत लिहिलं की, सॉरी आई मी खरी उतरू शकले नाही. रेमो डिसूजा गोव्यात आपल्या मित्राच्या लग्नात होते. रेमो आणि त्यांची पत्नी याच आठवड्यात एअरपोर्टवर दिसले होते. लिजेलने आपल्या इन्स्टावरुन काही वेळापूर्वी सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही शेअर केला होता.