मुंबई, 12 ऑगस्ट- देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने (RIL) त्यांच्या ग्राहकांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आता घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने कोणीही व्हिडिओ कॉल करू शकतील. यासाठी सेट टॉप बॉक्सला गीगा फायबर नेटवर्कसह जोडावं लागेल. कंपनीच्या मते, डिजीटल युगात ही एक क्रांती असणार आहे. जिओ फायबर सर्विस 5 सप्टेंबरपासून लॉन्च करण्यात येणार आहे. जिओ फायबरचा प्लॅन 100 Mbps पासून सुरू होईल. बेसिक प्लॅनला हा स्पीड देण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्लॅननुसार हा स्पीड 1 Gbps पर्यंत जाईल. या सर्व प्लॅनमध्ये वॉइस कॉल मोफत असतील. जिओ फायबर प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होतील. याशिवाय जिओ फायबर एक प्रिमिअर सर्विसही लवकरच लॉन्च करणार आहे. या सर्विसमध्ये ज्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होईल त्याच दिवशी ग्राहकांना तो सिनेमा पाहता येणार आहे. ही सर्विस 2020 च्या मध्यात सुरू करण्यात येणार आहे असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. मोठ्या घोषणा- जिओ प्रिमिअमचे ग्राहक सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशी घर बसल्या पाहू शकतील सिनेमे. याशिवाय कंपनीने डिओ पोस्ट पेड प्लॅन सर्विसही लॉन्च केली. रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड 14 टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणार आहे. जिओ फायबरचा वर्षभराचा पॅक घेतला तर HD TV मिळेल. जिओ फायबर सर्विस 5 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. जिओ फायबर सर्विसचे प्लॅन 100 Mbps पासून सुरू होतील. AGM ला कोण- कोण होतं उपस्थित- वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी, नीता अंबानी, मुकेश अंबानी यांच्या आई कोकिलाबेन अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी, आकाशची पत्नी श्लोका उपस्थित होते. VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं ‘असं’ खडसावलं