सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आजही सुशांतचे चाहते तिच्यावर जोरदार टीका करताना दिसतात
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री फारच आनंदी दिसत आहे.
रिया चक्रवर्ती या शेअर केलेल्या फोटोंमध्ये गर्ल गॅंगसोबत एन्जॉय करताना दिसून येत आहे. तिच्यासोबत अनुषा दांडेकर, शिबानी दांडेकरसुद्धा आहेत.
रिया चक्रवर्तीने आपले हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'आनंदाचे दिवस इथे परत आले आहेत'.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा जास्त पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीवर अनेक आरोप लावण्यात आले होते. दरम्यान तिला ड्रग्स प्रकरणात तुरुंगातदेखील जावं लागलं होतं.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आजही सुशांतचे चाहते तिच्यावर जोरदार टीका करताना दिसतात.