JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप, कार अपघातात गमावला जीव

वयाच्या 22 व्या वर्षी अभिनेत्रीनं घेतला जगाचा निरोप, कार अपघातात गमावला जीव

22 वर्षीय अभिनेत्री मेबीना मायकल हिचा कार अपघातात मृत्यू झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 मे : कन्नड टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री मेबीना मायकल हिचा वयाच्या 22 व्या वर्षी मंगळवारी संध्याकाळी एका कार अपघातात मृत्यू झाला. कन्नडमधील लोकप्रिय टीव्ही रिअलीटी शो ‘प्याते हुडुगिर हाल्ली लाइफ’ची विनर मेबीना मायकलच्या कारला नागमंगला तालुक्यात अपघात झाला. ज्यात तिचं निधन झालं. ती मडिकेरी येथील तिच्या गावी जात असताना रस्त्यात ही दुर्घटना घडली ज्यात मेबीनाला तिचा जीव गमवावा लागला. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार मेबीना तिच्या फ्रेंड्ससोबत तिच्या घरी जात होती. त्यावेळी रस्त्यात तिची कार एका ट्रॅक्टरला जाऊन धडकली. ज्यात मेबीनाचा जागीच मृत्यू झाला. मेबीनाच्या निधनानं पूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. रिअलिटी शो होस्ट आणि अभिनेता अकुल बालाजीनं मेबीनाच्या निधनाची माहिती ट्विटरद्वारे दिली.

मेबीनाच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यानं लिहिलं, माझी आवडली स्पर्धक आणि ‘प्याते हुडुगिर हाल्ली लाइफ- 4’ ची विजेती मेबीनाच्या निधनाचं वृत्त ऐकल्यावर मला धक्का बसला आहे. मला या गोष्टीवर अद्याप विश्वास होत नाही की मेबीनानं जगाचा निरोप घेतला आहे. या दुःखद काळात मी तिच्या कुटुंबीयांच्या सोबत आहे. तिच्या आत्म्यास देव शांती देवो.

या दुर्घटनेनंतर मेबीनाच्या मित्रांना हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण या अपघातात गंभीर दुखापत झाल्यानं मेबीनाचा मृत्यू झाला. तिच्या मित्रांवर मात्र सध्या उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या