JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Ranveer Singh : न्यूड फोटोशूट भोवलं! रणवीरवर गुन्हा दाखल, होऊ शकते अटक

Ranveer Singh : न्यूड फोटोशूट भोवलं! रणवीरवर गुन्हा दाखल, होऊ शकते अटक

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर दाखल झाली आहे. आता त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे?

0108

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच एक न्यूड फोटोशूट केलं. त्याच्या या फोटोशूटनं सगळ्यांनाच थक्क करुन सोडलंय. त्याच्या न्यूडफोटोशूटमुळे त्याच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या पहायला मिळत आहे.

जाहिरात
0208

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. मुंबई चेंबुर पोलीस ठाण्यात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

जाहिरात
0308

एनजीओ चालवणाऱ्या ललित श्यामने रणवीर सिंह विरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलांच्या मनात लाज निर्माण होईल आणि त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप रणवीरवर केला आहे.

जाहिरात
0408

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीरविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, तर आयटी कायद्याच्या अंतर्गत 67अ कलम दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रणवीरवर अटकेची टांगती तलवार असल्यांचं दिसतंय.

जाहिरात
0508

आयपीएस कलम 292 अंतर्गत पाच वर्ष आणि 294 अंतर्गत 3 वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. याशिवाय आयटी कायदा कलम 67अ अंतर्गत 5 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

जाहिरात
0608

त्यामुळे आता रणवीर सिंहला न्यूड फोटोशूट प्रकरणी अटक होणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जाहिरात
0708

दरम्यान, रणवीर सिंहने पेपर मॅगझिनसाठी हे अतिशय बोल्ड फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेता पूर्णपणे कपड्यांशिवाय दिसत आहे. कार्पेटवर बसून रणवीर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसून येत आहे.

जाहिरात
0808

रणवीरच्या या फोटोशूटला अनेक मोठमोठ्या कलाकरांनी पाठिंबा दर्शवला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या