JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'माझ्या गर्लफ्रेंडशी फ्लर्ट केलंस तर...' जेव्हा अनुष्काच्या चाहत्याला अभिनेत्यानं दिली होती धमकी

'माझ्या गर्लफ्रेंडशी फ्लर्ट केलंस तर...' जेव्हा अनुष्काच्या चाहत्याला अभिनेत्यानं दिली होती धमकी

विराटच्या अगोदर एका अभिनेत्याच्या प्रेमात अनुष्का आकंठ बुडाली होती आणि तिच्यासाठी हा अभिनेता चाहत्यावर भडकला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 मे : अभिनेत्री अनुष्का शर्मानं नुकताच 32 वा वाढदिवस साजरा केला. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यानं अनुष्कानं यंदा पती विराट सोबतच घरीच सेलिब्रेशन केलं. अनुष्का सध्या विराटसोबत क्विलिटी टाइम स्पेंड करत असून ती सोशल मीडियावर अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. विराट आणि अनुष्का लग्नाआधी अफेअर आणि ब्रेकअपच्या चर्चा बऱ्याचदा झाल्या. पण एक वेळ अशी होती की, विराट नाही तर बॉलिवूडमधील एका अभिनेत्याच्या प्रेमात अनुष्का आकंठ बुडाली होती आणि तिच्यासाठी या अभिनेत्यानं भर एअरपोर्टवर चाहत्यांशी पंगा घेतला होता. अनुष्का शर्मासाठी चाहत्यावर भडकणारा हा अभिनेता आहे रणवीर सिंह. दीपिकाशी रिलेशनशिपमध्ये येण्याआधी रणवीर आणि अनुष्का एकमेकांना डेट करत होते. एकेकाळी सिनेमातही त्यांची जोडी जबरदस्त हिट राहिली. दरम्यानाच्या काळात त्यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या. या दोघांनी ही गोष्ट कधीच पब्लिकली मान्य केली नाही मात्र काही किस्से त्याच्या रिलेशनशिपचे पुरावे आहे. हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार एअरपोर्टवर अनुष्काच्या एका चाहत्यानं तिच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे रणवीर त्याच्यावर एवढा भडकला होता की सर्वांसमोर त्यांनं त्या चाहत्याला झापलं. तुझ्या जिभेला जरा लगाम घाल. ती माझी गर्लफ्रेंड आहे. फ्लर्ट करशील तर तुझं नाक तोडून टाकेन. अर्थात या घटनेनंतर बऱ्याच काळानंतर हे दोघंही वेगळे झाले आणि रणवीरचं नाव दीपिकाशी तर अनुष्काचं नाव विराट कोहलीशी जोडलं जाऊ लागलं.

अनुष्का आणि रणवीर यांनी एकमेकांसोबत लेडीज वर्सेज रिकी बहल, बँड बाजा बारात, दिल धडकने दो अशा सिनेमात काम केलं आहे. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजही हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपापलं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या