मुंबई, 19 सप्टेंबर : एक महिना उलटून गेला अद्यापही प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात दाखल आहेत. डॉक्टरांची एक मोठी टीम त्यांना बरे करण्यासाठी मेहनत घेत असून त्यांच्या प्रकृतीविषयी नवनवीन अपडेट समोर येत असते. हृदय विकाराचा झटका आल्यांनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इतक्या दिवसानंतर अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाहीये. गेल्या 40 दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आलेली नाही. त्यांच्या मेंदुपर्यंत ऑक्सिजन पोहचत नसल्यामुळे त्यांना शुद्ध आलेली नाही. राजू सध्या व्हेंटिलेटरवर असले तरी त्यांचा भाऊ दीपूच्या म्हणण्यानुसार, राजूच्या डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढण्यासाठी अनेकदा विचार केला, मात्र वारंवार ताप येत असल्याने राजूला दिलेला व्हेंटिलेटरचा सपोर्ट कायम ठेवण्यात आला होता. हेही वाचा - नवा आठवडा नव्या अडचणी; Jacqueline Fernandez पुन्हा एकदा चौकशीच्या भोवऱ्यात राजू श्रीवास्तव यांचे कुटुंब, चाहते मित्र परिवार सगळेच ते ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉमेडियनसाठी प्रार्थना केली जात आहे. मात्र अजूनही राजूला शुद्ध न आल्यामुळे सगळेच चिंतेत आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआउट करत असतांना छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांना तब्बल 15 दिवसानंतर शुद्ध आली होती. परंतु काही सेकंदसाठी त्यांनी संवाद साधला होता. परंतु त्यांना प्रचंड अशक्तपणा होता. त्यानंतर पुन्हा त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे.