सोर्स : गुगल
मुंबई, 22 सप्टेंबर : देशातील सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10.20 वाजता निधन झाले. तब्बल 42 दिवस मृत्यूशी झुंज देणारे राजू श्रीवास्तव अखेर ही लढाई हरले. त्यांच्या जाण्यानं सगळीकडे शोककळा पसरली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव पंचतत्वात विलीन झाले. सर्वांना हसवणारे राजू श्रीवास्तव कायमचे नि:शब्द झाले. राजू श्रीवास्तव यांच्यावर आज म्हणजेच गुरुवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांनी रडलेल्या डोळ्यांनी निरोप घेतला. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री सुनील पाल, मधुर भांडारकर हे देखील स्मशानभूमीत पोहोचले आहेत. लोक राजू श्रीवास्तव अमर रहेच्या घोषणा देत आहेत. हेही वाचा - Raju Srivastava Death: राजू श्रीवास्तव यांचं शेवटचं स्वप्न अपूर्णच; करायचं होतं ‘हे’ काम राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव निगमबोध घाटावर पोहोचले आहे. त्याचे कुटुंबीयही पोहोचले आहेत. बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही राजूला अखेरचा निरोप देण्यासाठी निगमबोध घाटावर हजेरी लावली. कॉमेडियनच्या अखेरच्या दर्शनासाठी अनेकजण हजेरी लावत आहे. दरम्यान, जिममध्ये वर्कआउट करताना हृदय विकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल 41 दिवस ते मृत्यूशी लढत होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.