JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोरोनामुळे परदेशात अडकली अभिनेत्री, तिला पाहायला चाहते करतात घरासमोर गर्दी!

कोरोनामुळे परदेशात अडकली अभिनेत्री, तिला पाहायला चाहते करतात घरासमोर गर्दी!

कोरोना व्हायरसमुळे ही अभिनेत्री लंडनमध्ये अडकली आहे आणि विशेष म्हणजे तिथेही तिचे चाहते तिला पाहण्यासाठी तिच्या घरासमोर गर्दी करत असतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जून : कोरोना व्हायरसमुळे सध्या अनेकजण आपल्या कुटुंबांपासून दूर आहेत. तसे अनेक कलाकार सुद्धा परदेशात अडकले आहेत. अशाच एक मराठमोळी अभिनेत्री सध्या परदेशात आहे. पण या काळात तिचा स्टारडम अजिबात कमी झालेला नाही. एवढेच नाही तर तिचे परदेशातही अनेक चाहते आहेत. जे तिला ओळखतात आणि त्यामुळे सध्या तिच्या घरासमोर तिला पाहण्यासाठी गर्दी होत असते. ही अभिनेत्री आहे राधिका आपटे. राधिका आपटे सध्या तिच्या पतीसोबत लंडनमध्ये आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राधिकानं परदेशात तिच्यासोबत घडलेला किस्सा शेअर केला. राधिका म्हणाली, आजकाल परदेशातही भारतीय वेब सीरिज पाहिल्या जातात. त्यामुळे आता या ठिकाणी सुद्धा मला लोक अभिनेत्री म्हणून ओळखू लागले आहेत. त्यामुळे सध्या माझ्या घरासमोर मला पाहण्यासाठी गर्दी होते. सुरुवातीला मला हे सर्व मजेशीर वाटत होतं. पण आता त्याचा त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. मला रस्त्यात कधीही कोणीही हाक मारतं. असा प्रकार माझ्यासोबत तीन-चारवेळा घडला आहे.

राधिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूरच्या ‘वाह! लाइफ हो तो ऐसी!’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राधिकाने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. नेटफ्लिक्सवर देखील ती विशेष प्रसिद्ध आहे. मांझी, पॅडमॅन, बदलापूर, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये राधिकाने नेहमीच वेगळी भूमिका साकारली आहे. याशिवाय तिनं मराठी, बंगाली, मल्याळम सिनेमातही काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या