दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा स्वॅग सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. आपल्या स्टाईलने मन जिंकणाऱ्या अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकते.
दाक्षिणात्या सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) चा स्वॅग सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. कारणही तसंच आहे...त्याचा नुकताच 'पुष्पा' (Pushpa) सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमातील गाणी असो किंवा डायलॉक सगळ्यांची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे. सगळीकडे अल्लू अर्जुनची नादखुळ्या स्टाईलची चर्चा आहे. या नादखुळ्या स्टारची बायको स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) सुंदरतेच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकते.
अल्लू अर्जुनने 6 मार्च 2016 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. सोशल मीडियावर दोघेही मुलांसोबत फोटो शेअर करत असतात.
अल्लू अर्जुनने बायको दिसायला खूपच सुंदर आहे. नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते.
सुंदरतेच्या बाबतीत स्नेहा मॉडेल असेल किंवा अभिनेत्री या सर्वांना मात देताना दिसते. सोशल मीडियावर तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. . (सर्व फोटो साभार-Sneha Reddy इन्स्टा)