JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra: 'मी गेल्या 10 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये....'; प्रियांका चोप्रानं शेअर केला 'तो' अनुभव

Priyanka Chopra: 'मी गेल्या 10 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये....'; प्रियांका चोप्रानं शेअर केला 'तो' अनुभव

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रियांका सतत चर्चेत असते. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण खूप खास आहे.

जाहिरात

priyanka chopra

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी प्रियांका सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर कायम फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण खूप खास आहे. प्रियांकानं बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अशातच ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. यामुळे सध्या प्रियांका आणखीनच चर्चेत आली आहे. हॉलिवूडमध्ये हा मोठा टप्पा पार करण्यासाठी प्रियांकाला मोठी मेहनत घ्यावी लागली आहे. या प्रवासाविषयी प्रियांकानं पिंकव्हिलाशी संवाद साधला. यावेळी तिनं अनेक गोष्टींविषयी खुलासा केलेला पहायला मिळाला. हेही वाचा -  Ganesh Chaturthi 2022: अमृता रावने बाप्पाकडे केला होता खास नवस, पूर्ण होताच पोहोचली कर्जत मंदिरात ‘मी गेल्या 10 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये काम करत आहे, पण आता मला अशा भूमिका मिळत आहेत, ज्या मला करायच्या होत्या. दक्षिण आशियाई कलाकारांना इथे फारशा संधी नाहीत, हॉलीवूडला खूप संघर्ष करावा लागतो. त्याला इथे सहजासहजी मुख्य भूमिका मिळत नाहीत. एखादा बीग बजेट चित्रपट करायचा असेल तर खूप संघर्ष करावा लागतो’, असं प्रियांकानं म्हटलं.

संबंधित बातम्या

प्रियांका पुढे म्हणाली की, ‘मी नेहमीच उत्तम कामगिरी केली आहे. माझं ध्येय निश्चित आहे. भारतातही मी सर्वोत्कृष्ट टॅलेंटसोबत काम केले आहे आणि मला हॉलिवूडमध्येही ते फॉलो करायचं आहे. माझी भारतातील कारकीर्द यशस्वी झाली आहे. मी सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसोबत काम केले आहे, ज्याचा मला स्वतःचा अभिमान वाटतो. एक कलाकार म्हणून मला हॉलिवूडमध्येही अशीच कामगिरी करायची आहे’. दरम्यान, प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्येही झळकणार आहे. ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या