मुंबई, 05 ऑक्टोबर : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचं लग्न भारतातील हायप्रोफाइल लग्नांपैकी एक होत. लग्नाच्या आधी आणि नंतरही या लग्नाच्या चर्चा झाल्या. खरंतर निक-प्रियांका लग्न अतिशय खासगी स्वरुपात पार पडलं. इतकंच नव्हे तर लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये म्हणून पाहुण्यांना लग्नच्यावेळी फोन वापरण्यासही बंदी घालण्यात आली होती. त्यानतर परिणीती चोप्राकडून या लग्नातील बरेच किस्से ऐकायला मिळाले. पण या लग्नाशी संबंधी एक नवा किस्सा आता समोर आला आहे आणि हा किस्सा खुद्द प्रियांका चोप्रानंच शेअर केला आहे. प्रियांका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा The Sky Is Pink च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिनं नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिनं तिच्या लग्नात घडलेला एक किस्सा शेअर केला. देसी गर्लशी लग्न करण्यासाठी भारतात आलेल्या विदेशी नवरदेव निकनं या लग्नात बराच घाम गाळला होता. इतकंच नाही तर लग्नाची तयारी करताना निकनं चक्क सिलिंडर सुद्धा उचलले होते.
मुंबई मिररनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कपिल शर्मा शोमध्ये पोहोचलेल्या प्रियांकानं तिच्या लग्नातील एक किस्सा शेअर केला. प्रियांका म्हणाली, ‘मी लग्नाची तयारी करण्यासाठी जवळपास 10 दिवस अगोदर भारतात आले होते. त्यावेळी निक सुद्धा माझ्यासोबत होता. लग्नाच्या तयारीमध्ये त्यानं खूप मेहनतही घेतली इतकंच नाही तर एक वेळ अशीही आली की निकला सिलिंडर सुद्धा उचलावे लागले आणि त्यानं ते कामही केलं. निक आणि त्याच्या फॅमिलीसाठी भारतातील रिती-रिवाज खूपच वेगळे होते. त्यामुळे लग्नात खूपच धम्माल आली.’
प्रियांका पुढे म्हणाली, ‘जयमालाच्या वेळी निकच्या फॅमिलीला वाटलं की, कोणत्यातरी लढाईची तयारी सुरू आहे आणि आता त्यांनाही तयारी करावी लागणार. त्यावेळी त्यांनी निकला उठवलं आणि त्याला धक्का देऊ लागले.’ निक प्रियांकाच्या लग्नात निकचं संपूर्ण कुटुंब भारतात आलं होतं. यावेळी टीम ब्राइड आणि टीम ग्रुम यांच्यात एक क्रिकेट मॅच सुद्धा झाली होती. ज्यात टीम ब्राइडनं बाजी मारली.
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये निक आणि प्रियांकानं जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीन लग्न केलं. या लग्नाची चर्चा फक्त भारतातच नाही तर परदेशातही झाली. ============================================================ VIDEO: आरेतील झाडांवर रात्री कुऱ्हाड; 700 झाडं परत द्या! आंदोलकांचा आक्रमक पवित्रा