मुंबई,24ऑक्टोबर- हॉलिवूड (Hollywood) अभिनेता अॅलेक बाल्डविनच्या (Alic Baldwin)आगामी चित्रपट ‘रस्ट’ (Rust) च्या शूटिंग दरम्यान, अभिनेत्याने प्रॉप गनने गोळीबार केल्याने एक महिला सिनेमॅटोग्राफर हॅलिना हचिन्सचा**(Halyna Hutchins)** मृत्यू झाला तर चित्रपटाचे दिग्दर्शक जखमी झाले आहेत.या बातमीने जगभरात खळबळ उडाली आहे.या बातमीने ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जोनासलाही विचलित केलं आहे. या घटनेनंतर, तिने सोशल मीडियावर एक भावनिक नोट शेअर केली आहे. ज्यात अभिनेत्रीने हलिनासाठी शोक व्यक्त केला आणि लिहिले आहे, की चित्रपटाच्या सेटवर कोणीही मरू नये. अमेरिकन अभिनेता अॅलेक बाल्डविनने प्रॉप गनने गोळीबार केल्याच्या या घटनेने संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. या घटनेनंतर प्रियांका चोप्रा जोनससुद्धा खूप दुःखी आहे. तिने हलिनाचे एक छायाचित्र पोस्ट केलं आहे, ज्यात तिने दिवंगत सिनेमॅटोग्राफरच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. प्रियांकाने लिहिली इमोशनल पोस्ट- प्रियांकाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं आहे, ‘मला मोठा धक्का बसला आहे. या शोकांतिकेत सामील असलेल्या प्रत्येकाला काय वाटत असेल?याची मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्याकडे शब्द नाहीत. चित्रपटाच्या सेटवर कोणीही मरू नये. मला हेलेना हचिन्सच्या कुटुंबाबद्दल आणि तिला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी वाईट वाटत आहे, माझी प्रार्थना त्यांच्यासोबत आहे.
कंगना रणौतनेही लिहिली होती पोस्ट- यापूर्वी बॉलिवूड स्टार कंगना रणौतनेही या संपूर्ण घटनेवर तिची प्रतिक्रिया दिली होती. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले, ‘हे खूप भयानक आहे !! अनेक वेगवेगळ्या स्टंट, शस्त्रे आणि स्फोटकांसह चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रत्येकासाठी ही नोट… तुमच्या चुका कुणाचा तरी जीव घेऊ शकतात… हे खूप दुःखद आहे.’ (**हे वाचा:** धक्कादायक! अभिनेत्याने चुकून केला गोळीबार; सेटवर सिनेमॅटोग्राफरचा … ) ब्रूसलीच्या मुलासोबत घडली होती घटना- प्रॉप गनसोबत अशा घटना क्वचितच घडल्या आहेत. तथापि, याआधी प्रसिद्ध मार्शल आर्ट स्टार ब्रूस ली, यांचा 28 वर्षीय मुलगा ब्रॅंडन ली सोबत 1993 मध्ये ‘द क्रो’ च्या सेटवर अशीच घटना घडली होती. तिलाही अशीच गोळी झाडण्यात आली होती. या बातमीचीही बरीच चर्चा झाली होती. (**हे वाचा:** ‘Sardar Udham’फेम बनिता संधू 3 वर्षे होती डिप्रेशनमध्ये;अभिनेत्रीने अशी केली मात ) प्रियांका चोप्रा वर्कफ्रंट- प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या आगामी स्पाय थ्रिलर ड्रामा ‘सिटाडेल’चा एक भाग आहे. अभिनेत्रीने स्वतः चित्रपटात अनेक स्टंट केले आहेत, ज्यामुळे तिला अनेक जखमा देखील झाल्या आहेत. तिने तिच्या भुवया आणि डोक्याला झालेल्या दुखापतीची छायाचित्रे लोकांसोबत शेअर केली होती.