JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Priyanka Chopra:'गेंदा फूल' गाण्यावर प्रियांकाच्या मुलीनं धरला ठेका, क्युट VIDEO होतोय व्हायरल

Priyanka Chopra:'गेंदा फूल' गाण्यावर प्रियांकाच्या मुलीनं धरला ठेका, क्युट VIDEO होतोय व्हायरल

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस सतत चर्चेत असते. नुकतंच प्रियांकानं तिची चिमुकली मालतीचा एक क्युट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 ऑगस्ट: बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस सतत चर्चेत असते. प्रियांका आपली मुलगी मालती आणि नवरा निक जोनस यांच्यासोबत नेहमीच फोटो शेअर करत असते. त्यांच्या फोटोंना चाहत्यांचं खूप सारं प्रेम मिळत असतं. नुकतंच प्रियांकानं तिची चिमुकली मालतीचा एक क्युट डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर सध्या अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर मुलीसोबतचा मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये मालती ‘दिल्ली 6’ चित्रपटातील ‘गेंदा फूल’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मालतीच्या हा व्हिडीओनं अनेकांचं मन जिंकलं आहे. व्हिडिओमध्ये मालतीची पाठ कॅमेऱ्याकडे असून बॅकग्राउंडमध्ये ‘गेंडा फूल’ हे गाणे वाजत असल्याचे दिसून येत आहे. नेहमीप्रमाणेच या व्हिडिओमध्येही प्रियांका चोप्राने मुलगी मालतीचा चेहरा दाखवलेला नाही.

संबंधित बातम्या

‘प्रियांकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत. ‘खूप सारं प्रेम, तू खूप छान दिसतेय, क्युट, अॅडोरेबल’,अशा अनेक सुंदर कमेंट चाहते करत आहेत. प्रियांका सोशल मीडियावर कायम फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. चाहतेही तिच्या पोस्टवर भरभरून प्रेम देतात. हेही वाचा -  VIDEO: भर कार्यक्रमात हृतिक रोशननं धरले चाहत्याचे पाय; नेमकं काय घडलं? दरम्यान, सरोगसी द्वारे आई बाबा झाल्यानंतर प्रियांकाची लेक मालती जवळपास 100 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. मालतीला घरी आणल्यापासून निक आणि प्रियांका दोघेही तिच्यासोबत क्वालिटी टाईम घालवताना पहायला मिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या