मराठी सेलिब्रिटींनी खेळली होळी; पाहा धम्माल फोटो
होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अगदी सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण विविध रंगांची उधळण करुन हा सण साजरा करतात. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
यंदाच्या होळीला आता केवळ एकच दिवस उरला आहे. त्यामुळं सेलिब्रिटींचे होळी खेळतानाचे फोटो आणि व्हिडीओज सध्या चर्चेत आहेत. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
मालिकांमध्ये रंगपंचमीची धूम पाहायला मिळतेय. स्टार प्रवाह वरील 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
सर्वत्र होळीची धामधूम असली तरी शुभम-कीर्तीच्या नात्यात आलेला दुरावा अद्याप तसाच आहे. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
शुभमचं हे वागणं कीर्तीला खटकतंय. त्यामुळं दोघांमधील दुरावा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
होळीच्या निमित्तानं सेटवरील सर्व कलाकारांनी जल्लोषात रंगांची उधळण केली. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
कलाकारांनी खेळलेल्या या अनोख्या होळीचे फोटो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)
पाण्याचा वापर न करता इकोफ्रेंडली रंगानं ही होळी खेळली गेली. (Phulala Sugandh Matichaa/Instagram)