बॉलिवूड अभिनेत्रींनी दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात सर्वात जास्त चर्चेत असलेले फोटो अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि ऋचा चढ्ढा (Richa Chadda) यांचे आहेत.
सोशल मीडियावर सध्या अनेक कलाकार आपआपल्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. पण सर्वात जास्त चर्चा आहे ती अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि ऋचा चड्ढा (Richa Chadda) यांनी शेअर केलेल्या पोस्टची.
अनुष्काने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये 3 फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आणि आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुष्काने शेअर केलेले हे व्हिडीओ प्रचंड हिट होत आहेत. यामध्ये तिचा बेबी बम्पही दिसत आहे. या फोटोंना तिच्या फॅन्सनी अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत.
अनुष्का तिचा प्रेग्नंसी पीरियड चांगलाच एन्जॉय करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा आणि विराटचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अभिनेत्री ऋचा चढ्ढाने यंदा दिवाळीनिमित्त शेअर केलेला फोटो अतिशय वेगळा आहे. हातात फूल घेऊन वेगळ्या पद्धतीने नेसलेली साडी पाहून अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण आली अशी कॉमेंट एका चाहत्याने केली आहे. जैत रे जैत चित्रपटामध्ये स्मिता पाटील यांचा लूक असाच होता.