अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्या पवित्र रिश्ता मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अंकिता-विकीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मेहंदी, संगीत, हळदी, साखरपुडा हे सगळे कार्यक्रम पार पडले. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिके तिच्या बहिणीची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि प्रिया मराठे यांनी देखील हजेरी लावली होती. प्रार्थनाने याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'पवित्र रिश्ता' मालिकेत महत्त्वाची भूमिका असलेला अंकिताचा खास मित्र महेश शेट्टीही यावेळी उपस्थित होता.
अंकिता आणि विकीच्या लग्नसोहळ्यात 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या कलाकारांचं रियुनियन पाहायला मिळालं.
अंकिता लोखंडेचं लग्न फार थाटामाटात झालं.मुंबईच्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
अंकिताच्या लग्नासाठी हॉटेलला अगदी राजवाड्यासारखं सजवण्यात आलं होतं. तसेच विविध महाराष्ट्रीयन थीमसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या.