शाहरुख खान
मुंबई,15 जानेवारी- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान गेल्या चार वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अभिनेता ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटासोबत पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सध्या सर्वत्र पठाणची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता जगाराभरतील चाहते पठाणसाठी उत्सुक आहेत. दरम्यान दुबईच्या जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीवर किंग खान शाहरुखच्या ‘पठाण’ चा ट्रेलर धुमधडाक्यात चालवण्यात आला. यावेळी स्वतः शाहरुख त्याठिकाणी उपस्थित होता. शाहरुख खान चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर पडद्यावर पुनरागमन करत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याच्या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अशातच आता कालची रात्र दुबईची जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारत शाहरुख खानच्या ‘पठाण’च्या ट्रेलरने झळाळून निघाली. शाहरुख खान यावेळी स्वतः उपस्थित होता. अभिनेत्याचा आनंद आणि उत्साह बघण्यासारखा होता. विशेष म्हणजे शाहरुख खानने यावेळी आपली सिग्नेचर स्टेपसुद्धा केली. जे पाहून चाहते अक्षरशः घायाळ होत आहेत. (हे वाचा: Pathaan: विवादात अडकलेल्या ‘पठाण’ चा ट्रेलर लीक; मेकर्सना मोठा फटका, VIDEO होतोय VIRAL **)** शाहरुख खानच्या ‘पठण’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. अभिनेत्याचे चाहते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.
पठाणच्या माध्यमातून पुन्हा एकदा शाहरुख आणि दीपिकाची केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. ही दोघांच्या चाहत्यांसाठी एक मोठी मेजवानीच असणार आहे.
‘पठाण’ चित्रपटाची देशासोबतच परदेशातसुद्धा धूम दिसून येत आहे. अभिनेत्याचे जगभरातील चाहते पठाणच्या रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. दुबईतसुद्धा अभिनेत्याचा जलव दिसून आला. अभिनेत्याच्या पठाणचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवताच चाहते आनंदाने भारावून गेले होते. अभिनेता स्वतः त्याठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होता.
मात्र ‘पठाण’ चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित होताच अडचणीत आलं होतं. या गाण्यात दीपिकाने घातलेल्या बिकिनीवर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच या गाण्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचं सोशल मीडियावरुन सांगण्यात आलं होतं. काही ठिकाणी पठाणचे पोस्टरसुद्धा फाडण्यात आले होते. हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.