JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sanjay Chouhan Death: बॉलिवूडवर शोककळा; 'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचं निधन

Sanjay Chouhan Death: बॉलिवूडवर शोककळा; 'पान सिंह तोमर' चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचं निधन

मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘पान सिंह तोमर’ या प्रसिद्ध चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचं निधन झाल आहे.

जाहिरात

संजय चौहान

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 जानेवारी- मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘पान सिंह तोमर’ या प्रसिद्ध चित्रपटाचे लेखक संजय चौहान यांचं निधन झाल आहे. ते अवघ्या 62 वर्षांचे होते. मुंबईच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये लेखन केलं आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. संजय चौहान हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय लेखक होते. त्यांनी अनेक हटके चित्रपटांमध्ये लेखन केलं आहे. त्यांच्या कामाची नेहमीच प्रशंसा झाली आहे. ते आपल्या भारदस्त लेखनासाठी ओळखले जातात. त्यांच्या अचानक निधनाने मनोरंजन सृष्टीवर दुःखच डोंगर कोसळलं आहे. 12 जानेवारीला संजय चौहान यांनी मुंबईच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. (हे वाचा: Tunisha Sharma : तुनिषा प्रकरणात नवा ट्विस्ट, शीझाननंतर आता ‘अली’ची एण्ट्री, कोर्टात ड्रामा! ) संजय चौहान गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना लिव्हर संबंधी आजाराने ग्रासलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अशातच त्यांचं निधन झालं. ते अवघ्या 62 वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा कुटुंब आहे. संजय चौहान यांनी इरफान खानच्या ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटात लेखन केलं आहे. याशिवाय त्यांनी तिगमांशू धुलिया यांच्या ‘साहब बीवी गँगस्टर’ चित्रपटात लेखन केलं आहे. ‘आय एम कलाम’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचा फिल्मफेयर पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. तसेच धूप आणि मैने गांधी को नही मारा हे सुद्धा त्यांचे चित्रपट चर्चेत आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या