JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 10 व्या दिवशी आणखी एक अभिनेत्री घरात मृतावस्थेत आढळली; मनोरंजन क्षेत्रातील मृत्यूंचं गूढ वाढलं!

10 व्या दिवशी आणखी एक अभिनेत्री घरात मृतावस्थेत आढळली; मनोरंजन क्षेत्रातील मृत्यूंचं गूढ वाढलं!

दहा दिवसांपूर्वी आणखी एक अभिनेत्री घरात मृतावस्थेत आढळली होती. त्यात पुन्हा आलेल्या या वृत्ताने चिंता वाढली आहे.

0105

15 रोजी गाली टीव्ही अभिनेत्री पल्लवी डे ही कोलकत्ता येथील गरफा भागातील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. यानंतर अवघ्या 10 दिवसात प्रसिद्ध मॉडेल आणि नवोदित बंगाली अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदार (Bidisha De Mujumdar) आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली आहे.

जाहिरात
0205

बिदीशा डे मुजुमदार ही अभिनेत्री अवघ्या 21 वर्षांची होती. ती आपल्या आई वडिलांसोबत भाड्याने एका अपार्टमेंटमध्ये राहात होती. बुधवारी बिदीशा आपल्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.

जाहिरात
0305

पोलीस अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींचीदेखील चौकशी करत आहेत.ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र पोलीस अद्याप शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत.

जाहिरात
0405

बिदीशा डे मुजुमदार ही एक लोकप्रिय मॉडेल होती. तसेच तिने 2021 मध्ये अनिरबेद चटोपाध्याय दिग्दर्शित 'भार: द क्लाऊन' या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या शॉर्ट फिल्ममध्ये प्रसिद्ध बंगाली अभिनेता देबराज मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसला होता.

जाहिरात
0505

ही नक्की आत्महत्याच आहे की, यामागे कोणाचा हात आहे..याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या