JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मीरा चोप्राचे चित्रपट का झाले फ्लॉप? प्रियांकावर केला होता करिअर संपवल्याचा आरोप

मीरा चोप्राचे चित्रपट का झाले फ्लॉप? प्रियांकावर केला होता करिअर संपवल्याचा आरोप

‘प्रियांका चोप्रामुळं माझं करिअर संपलं’; बहिणीनंच केला खळबळजनक आरोप

0107

मीरा चोप्रा (Meera Chopra) ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मादक अदा आणि अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर तिनं स्वत:चा असा एक वेगळा फॅन फॉलोइंग निर्माण केला आहे.

जाहिरात
0207

मीराचा आज वाढदिवस आहे. 38 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
0307

दाक्षिणात्य सनेसृष्टीत कमाल करणाऱ्या या अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये मात्र जम बसवता आला नाही. अन् या अपयशासाठी तिने अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला जबाबदार धरलं होतं.

जाहिरात
0407

मीरा ही प्रियांकाच्या सख्ख्या काकाची मुलगी आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या करिअवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं प्रियांकावर करिअवर संपवल्याचे आरोप केले होते.

जाहिरात
0507

मीरानं 2014 साली गॅग्स ऑफ घोस्ट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. अन् यासाठी ती प्रियांकाला जबाबदार धरते. प्रियांका तिची बहिण असल्यामुळं कायम तिची तुलना तिच्यासोबत केली गेली.

जाहिरात
0607

तिनं देखील करिअरच्या सुरुवातीस अनेक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एका रात्रीत तिला इतकी प्रसिद्धी मिळाली नाही पण समिक्षक, प्रेक्षक, निर्माते सर्वजण तिच्या यशाचा आलेख प्रियांकाशी तुलना करुन पाहातात. त्यामुळं तिचं बॉलिवूडमधील करिअर संपलं.

जाहिरात
0707

ती म्हणाली, “लोकांना वाटतं मी प्रियांकाची बहिण असल्यामुळं मला काम मिळतं. पण हे साफ खोटं आहे. उलट तिच्या प्रसिद्धीचा कायम मला तोटाच झाला आहे.” प्रियांचा द्वेष करणारे मला काम देत नाहीत कारण मी तिची बहिण आहे. अन् तिचे चाहते कायम तुलना करतात. त्यामुळं मीरा सध्या द्विधा मनस्थितीत असल्याचं सांगते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या