JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / TRP Meter : 'या' मालिकेची नव्यानं एंट्री, पाहा आठवड्यात कोण आहे टॉपवर

TRP Meter : 'या' मालिकेची नव्यानं एंट्री, पाहा आठवड्यात कोण आहे टॉपवर

मागच्या आठवड्यात ‘भागो मोहन’ आणि ‘अल्टी पल्टी’ या दोन मालिका नव्यानं सुरू झाल्या होत्या त्यापैकी एका मालिकेन पहिल्याा टॉप 5 मध्ये स्थान पटकावलं आहे.

0107

प्रत्येक आठवड्याच्या टीआरपी रेटिंगची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता असते. कोणती मालिका कोणत्या स्थानावर आहे. याबाबात जाणून घेणं सर्वांना सर्वांना आवडतं. पाहा या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगचे अपडेट्स...

जाहिरात
0207

मागच्या आठवड्या प्रमाणं राणादानं नंबर 1 काही सोडला नाही. याही वेळी 'तुझ्यात जीव रंगला' मालिका 1 नंबरवर आहे. प्रेक्षकांचा राणादामध्ये जीव रंगलाय अजून. राणादाचा बदललेला सूर आणि नूर प्रेक्षकांना आवडतोय.

जाहिरात
0307

दुसरा नंबर गेल्या वेळचाच आहे. माझ्या नवऱ्याची बायको याही वेळी नंबर 2वरच आहे. कधी काळी सतत नंबर 1 राहणारी ही मालिका, आता तिचं स्थान घसरलंय. कारण फार वेगळं काही पाहायला मिळत नाहीय.

जाहिरात
0407

या आठवड्यात टीआरपी रेटिंगमध्ये स्वराज्य रक्षक संभाजी मालिका तिसऱ्या स्थानवर कायम आहे.

जाहिरात
0507

नव्यानं सुरू झालेल्या भागो मोहन प्यारे कॉमेडी-हॉरर मालिकेनं या आठवड्यात चौथं स्थान पटकावलं आहे. ही मालिका मागच्याच आठवड्यात सुरू झाली आहे.

जाहिरात
0607

पाचव्या स्थानावर आहे मिसेस मुख्यमंत्री मालिका. मी मिरवणार सगळ्यांची जिरवणार म्हणत या मिसेस मुख्यमंत्रीनं सगळ्यांची मनं जिंकलीयत. अमृता धोंगडेची सुमी सध्या खूपच चर्चेत आहे. पूर्ण नवीन कलाकारांना घेऊन या मालिकेनं पहिल्या पाचात स्थान मिळवलंय.

जाहिरात
0707

या वेळीही टीआरपी रेटिंगमध्ये पुन्हा एकदा झी मराठीच आहे. स्टार प्रवाह, कलर्स मराठी यांनी पहिल्या पाचात नंबर पटकावला नाहीये.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या