(Tanvi Mundle Pahile na mi tula actress) नव्या कोऱ्या मराठी मालिकेतली ही नवोदित अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू लागली आहे. पाहा तन्वीचं लेटेस्ट फोटोशूट
पाहिले न मी तुला या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली मराठी अभिनेत्री तन्वी मुंडलेचं नवं फोटो फोटो शूट सोशल मीडियावर गाजत आहे.
तन्वीनं नुकतंच या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या पाहिले न मी तुला या मालिकेत तन्वी सोबत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेता आशय कुलकर्णीसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत.
तन्वीनं आपल्या या मराठमोळ्या पारंपरिक वेशात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तन्वी ही सिंधुदुर्ग मधील कुडाळची आहे. तिनं आपलं बीएससीचं शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलं आहे.