‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत या आठवड्यात अनाजी पंतांचं कारस्थान संभाजी महाराजांच्या समोर येणार.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांवर विषप्रयोग झाला. त्यातून ते वाचले. पण या कटाचा सूत्रधार कोण याचा शोध सुरू झाला.
इकडे सोयराबाईंना अकबराला अनाजी पंतांनी लिहिलेल्या पत्रावर आपण शिक्का मारला, याचा पश्चात्ताप होतोय.
अनाजी पंतांचं कटकारस्थान अकबरच संभाजी महाराजांपर्यंत पोचवतो. अनाजी पंत अर्ध स्वराज्य अकबराला द्यायला तयार झाल्याचंही संभाजी महाराजांना कळतं.
अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली द्यायचं फर्मान संभाजी महाराज काढतात. याच आठवड्यात मालिकेत हे पाहता येईल.