नेहानं नुकतंच इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर करत ती प्रेमात असल्याची कबूली दिली.
बिग बॉस मराठीच्या 12व्या सीझनमधील स्पर्धक आणि मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अभिजीत खांडकेकरनं केलेल्या एका पोस्टमुळे नेहाच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
नेहानं लग्नाच्या चर्चांवर या अफावा असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही आता तिच्या लग्नाची बातमी कन्फर्म झाली असून नेहा लवकरच शार्दुल सिंग बयास या बिझनेसमनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
नेहा शार्दुलच्या प्रेमात असून तिनं नुकतच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड शार्दुलसोबतचा एक फोटो शेअर करत ती प्रेमात असल्याची माहिती दिली.
शार्दुल सिंग बयास हा एक बिझनेसमनअसून नेहा आणि शार्दुलनं मिलान इथे खाजगीपणे साखरपुडा केला आहे. लवकरच ते लग्न करतील अशी चर्चा आहे.
नेहा व्यतिरिक्त शार्दुलनंही नेहा सोबतचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात शार्दुल आणि त्याच्या फॅमिलीसोबत नेहा दिसत आहे.
नेहानं मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.