नेहा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि गायिका म्हणून ओळखली जाते.
बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय पण तितक्याच वादग्रस्त शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो.
हा शो आतापर्यंत टीव्हीवर दाखवला जात होता. परंतु आता लवकरच बिग बॉसचं ऑनलाईन वर्जन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
नेहा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि गायिका म्हणून ओळखली जाते. ती आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
लक्षवेधी बाब म्हणजे बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच नेहाने काही अजब विधानं करण्यास सुरूवात केली आहे.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत नेहानं बिग बॉस शोवर भाष्य केलं. यामध्ये ती म्हणाली, “मी माझं बाथरूम आणि बेड इतरांसोबत शेअर करणार नाही.
“मी स्वत:च्या वस्तुंच्या बाबतीत अत्यंत संवेदशनशील आहे. मी माझ्या वस्तु इतरांना वापरायला देत नाही.”
बिग बॉसमध्ये यापूर्वी देखील वस्तुंच्या वाटपावरून अनेकदा भांडणं झाली आहेत. या पार्श्वभूमीवर घरात जाण्यापूर्वीच नेहानं इतर स्पर्धकांना इशारा दिला आहे.
नेहा अत्यंत बोल्ड मॉडेल म्हणून चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसमध्ये ती बोल्डनेसचा तडका कसा लावणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.