JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या पत्नी नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या...

ऋषी कपूर यांच्या आठवणीत भावुक झाल्या पत्नी नीतू, Photo शेअर करुन म्हणाल्या...

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांच्या सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मे : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांनी 30 एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या कुटुंबातला प्रत्येक सदस्य त्यांच्या आठवणीत भावुक झाला आहे. ऋषी कपूर यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या पत्नी नीतू सिंह नेहमीच त्यांच्या सोबत राहिल्या. पण आता ऋषी यांच्या निधनानंतर नीतू आपल्या पतीला खूप मिस करत आहेत. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांच्या सोशल मीडियावरून एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची लव्ह स्टोरी तर संपूर्ण बी टाऊनमध्ये प्रसिद्ध होती. पतीच्या अशा एक्झिटमुळे अर्थातच नीतू खूप दुःखी आहेत. प्रत्येक क्षण आपल्या पतीसोबत राहिलेल्या नीतू आता मात्र एकट्या पडल्या आहेत. अशात ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू यांनी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला नीतू यांनी इमोशनल कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं, ‘आमच्या कथेचा शेवट’ यासोबतच नीतू यांनी एक हार्ट इमोजी पोस्ट केली आहे.

नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात एका सिनेमाच्या सेटवरुन झाली होती. नीतू आणि ऋषी ‘जहरीला इंसान’ या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. सुरुवातीची भांडणं नंतर प्रेमात बदलली. खरं तर दोघांसाठी दोघांसाठी हे ‘पहला पहला प्यार’ असा काही भाग नव्हता पण त्यांचं हे नातं जन्मोजन्मीच्या बंधानात अडकलं. अशात नीतू यांनी कधीच आपल्या पतीच्या अशा एक्झिटचा विचार केला नव्हता. मोबाइलचा अतिवापर पडला महागात, अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला झाला गंभीर आजार ऋषी कपूर मागच्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते. 8 महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांनी मे 2019 मध्ये पहिल्यांदा त्यांना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी ते भारतात परतले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते वरचे वर आजारी पडत होते. अखेर 30 एप्रिलला त्यांनी मुंबईच्या एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. रणवीर सिंह असा झाला होता ‘मुराद’, पाहा ‘गली बॉय’चे UNSEEN PHOTOS जॅकी श्रॉफची लेक कृष्णाचा रोमँटिक अंदाज, बॉयफ्रेंडला Kiss करतानाचे फोटो व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या