JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मोठं घर आणि सर्व सुखं असूनही...' ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू झाल्या भावुक

'मोठं घर आणि सर्व सुखं असूनही...' ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू झाल्या भावुक

नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जून : बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनाला आता जळपास दोन महिने उलटून गेले आहेत. पण त्यांचे कुटुंबीय मात्र अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अशा आता ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर यांनी सुद्धा त्यांच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो कोणत्यातरी पार्टीमधला आहे. या फोटोमध्ये ऋषी कपूर सूटमध्ये दिसत आहेत. तर नीतू कपूर यांनी पिंक कलरचा ड्रेस घातला आहे. हा फोटो इनस्टाग्रामवर शेअर करताना नीतू कपूर यांनी त्याला एक इमोशल कॅप्शन सुद्धा दिलं आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये नीतू यांनी लिहिलं, लहान असो किंवा मोठी आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतः लढायची आहे. तुमच्याकडे मोठं घर आण सर्व सुख-सुविधा असतानाही तुम्ही दुःखी असता. तर कधी हे सर्व नसतानाही सर्वांपेक्षा आनंदी असता. हे सर्व आपल्या डोक्यात असतं. आज सर्वांचं मन खंबीर असण्याची आणि चांगल्या भविष्याची अशा असण्याची गरज आहे. मनात असलेली अशा तुम्हाला जगण्याची प्रेरणा देते. मेहनतीवर भर द्या. आपल्या माणसांना महत्त्व द्या. कारण तेच तुमची सर्वात मोठी दौलत आहेत. या पोस्टसोबत त्यांनी दोन हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या