नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : सोशल मीडियावर कधीही कोणताही ट्रेंड येतो. त्यात काहीही असू शकतं. कधी ट्रोल केलं जातं तर कधी कौतुक केलं जातं. त्यातच टिकटॉक व्हिडिओ तर धुमाकूळ घालत आहेत. सध्या नेहा कक्करने गायलेल्या गाण्यावर अनेकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नेहा कक्करच्या अनेक गाण्यावर चाहते व्हिडिओ तयार करतातय यावेळी तिने एक दर्दभऱ्या आवाजातलं गाणं शेअर केलं. त्यानंतर चाहत्यांनी रडत असलेले व्हिडिओ त्या गाण्यासोबत शेअर केले आहेत. नेहा कक्करने मरजावा चित्रपटातलं तुम ही आना या गाण्याच्या काही ओळी गायल्या. त्याच्या व्हिडिओ नेहाने टिकटॉकवर शेअर केला. त्यानंतर चाहत्यांचे दु:ख अश्रू होऊन आले आणि सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरू झाली. टिकटॉकवर नेहाने म्हटलेल्या गाण्यावर अनेकांचे व्हिडिओ धुमाकूळ घालत आहेत. टिकटॉक सेलिब्रेटींनीसुद्धा याचे व्हिडिओ केल्यानं नेहाने म्हटलेलं गाणं ट्रेंडमध्ये आलं आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका असेलेली नेहा कक्कर नेहमीच चर्चेत असते. 2006 मध्ये इंडियन आयडॉलमध्ये भाग घेणारी नेहा कक्कर आता त्याच शोमध्ये जज आहे. ‘ठरलं ते झालं नाही तर…’,युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान