मुंबई, 21 ऑगस्ट- ‘सैराट’च्या माध्यमातून सर्वांनाच झिंगाट करणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे होय. अत्यंत कमी परंतु रोखठोक बोलण्यासाठी ते ओळखले जातात. सोशल मीडियावरसुद्धा ते सतत व्यक्त होत असतात. नुकतंच नागराज मंजुळे यांनी एक पोस्ट शेअर करत आपण प्रकाशित करत असलेल्या एका कवितासंग्रहाबाबत सांगितलं आहे. लवकरच या कवितासंग्रहाचं प्रकाशन होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वास्तविक नागराज मंजुळे संग्राम नावाच्या तरुणाचा हा कवितासंग्रह प्रकाशित करत आहेत. विक्रांत नावाच्या तरुणाकडून दोन वर्षां त्यांनी या कवित्या ऐकल्या होत्या. आणि त्यांना या कविता प्रचंड भावल्या. परंतु त्या कधी कुठेही प्रकाशित झालेल्या नव्हत्या. त्यामुळे नागराज यांनी निर्णय घेतला की, आपल्या आटपाडी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून त्या कवितांना एका कवितासंग्रहाचं रुप द्यायचं. आणि त्यानुसार त्यांनी या सुंदर कवितांना कवितासंग्रहाचं रुप दिलं आहे. नागराज मंजुळे पोस्ट- कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.एखादी चांगली कविता वाचली की खूप समृद्ध झाल्यागत वाटतं.काही वर्षांपूर्वी विक्रांतच्या तोंडून संग्रामच्या कविता ऐकल्याआणि भारावून गेलो.नंतर कळलं की संग्रामनं एकही कविता कधी कुठं प्रकाशित केली नाही. अलुफ ,आत्ममग्न संग्रामनं त्याची कविता मित्रांच्या मैफिलीबाहेर कुठं जाऊच दिली नाही.संग्रामनं जणू आपल्याच गाळलेल्या जागा भरल्या आहेत.ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागतच आणखी एक जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला आहे हे जाणून जरासं दुकटं वाटलं…संग्रामच्या कविता मला प्रचंड आवडल्या.वाटलं ह्या कवितांची अनुभूती आनंद सगळ्यांना घेता यावाम्हणूनच आटपाटच्या माध्यमातून ‘रिकामटेकड्याचे आत्मवृत्त’ हा संग्राम बापू हजारे या मित्राचा पहिला संग्रह प्रकाशित करतोय…आशा आहे तुम्हाला आवडेल.भेटू सांगलीत….27 ऑगस्ट संध्याकाळी 4 वाजताविष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली.
**(हे वाचा:** Amruta Khanvilkar: हा ‘क्युट बॉय’ नेमका कोण? अमृतासोबत ‘त्या’ मुलाला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न ) नागराज मंजुळे हे मराठीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. सोबतच ते एक उत्कृष्ट कवीदेखील आहेत. आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून ते अनेक सामाजिक विषय हाताळताना दिसून येतात. वास्तवाची जाण असणारा कलाकार अशी त्यांची ओळख आहे. आपल्या सैराट या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी फक्त महाराष्ट्रच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यांनी नाळ, फॅन्ड्रीसारख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच त्यांनी अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.