JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Nagraj Manjule: नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; 'नाळ 2' बाबत महत्त्वाची अपडेट

Nagraj Manjule: नागराज मंजुळेंची मोठी घोषणा; 'नाळ 2' बाबत महत्त्वाची अपडेट

मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं.

जाहिरात

नागराज मंजुळे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 ऑक्टोबर-   मराठी चित्रपटसृष्टीतील अभ्यासू आणि सामाजिक भान असणारा दिग्दर्शक अशी नागराज मंजुळे यांची ओळख आहे. नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटात काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं. सैराट,फॅन्ड्री ही त्यातीलच काही उदाहरणे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोकांचं लक्ष लागून असतं. ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटात नागराज मंजुळे दिसले होते. या चित्रपटातील कथानक आणि बालकलाकारपासून ते सर्व दिग्गज कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन गेला होता. नागराज मंजुळे पुन्हा एकदा लोकांना भुरळ पाडण्यासाठी आणि विचारमग्न करण्यासाठी ‘नाळ 2’ मधून परत येत आहेत. नुकतंच त्यांनी ‘नाळ 2’ ची घोषणा करत चाहत्यांना खुश केलं आहे. नाळ- 2018 मध्ये ‘नाळ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुधाकर रेड्डी येकांती यांनी केलं होतं. तर नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. इतकंच नव्हे तर नागराज मंजुळे यांनी या चित्रपटात अभिनयसुद्धा केला होता. एका चिमुकल्या मुलाचं भावविश्व सांगणारी ही कथा आहे. यामध्ये चैतन्यची मुख्य भूमिका बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने साकारली होती. तर नागराज मंजुळे यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना आणि समीक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. या चित्रपटाला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. पहिल्या भागाच्या अफाट यशानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग भेटीला येणार आहे. **(हे वाचा:** Sahela re movie: ‘नातं जुनं…नवा कनेक्ट’; मृणाल कुलकर्णींचा ‘सहेला रे’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला ) नागराज मंजुळे यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन नाळचा दुसरा भाग भेटीला येत असल्याची गोड बातमी दिली आहे. त्यामुळे प्रेक्षक फारच उत्सुक झाले आहेत. नागराज मंजुळे यांचा सिनेमा म्हटलं की काही ना काही रंजक पाहायला मिळतं. आता या चित्रपटात पहिल्या भागापेक्षा नेमकं काय वेगळं असणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. परंतु या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण चित्रपटाने टीमने नुकतंच शूटिंगला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या

नागराज मंजुळे पोस्ट- मागच्या महिन्यात सुधाकरने अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकवायला कधी भेटुयात ?नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं.पहिल्या “नाळ” प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे !“नाळ 2” नावानं चांगभलं !!!

नागराज मंजुळे यांनी पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. ‘नाळ 2’ च्या घोषणेनंतर प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले आहेत. नाळ प्रमाणेच ‘नाळ 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या