मायरा वैकुळ
मुंबई, 26 ऑक्टोबर : भाऊबीज हा सण बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा प्रतिक आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला छान भेटवस्तू देतो. आज या खास दिवशी अनेकजण आपल्या भावाविषयीचं प्रेम व्यक्त करताना दिसतात, त्यांच्यासोबत अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करतात. अशातच भाऊबिजच्या निमित्तानं लोकप्रिय बालकलाकार मायरा वैकुळ म्हणजेच सर्वांची लाडकी चिमुकली परी हिनेही फोटो शेअर केले आहेत. मायराच्या या लेटेस्ट फोटोंनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. मायरा वैकुळने तिच्या इन्स्टाग्रामवर भाऊबिजेच्या निमित्तानं तिच्या भावासोबत काही खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे क्युट फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटो शेअर करत तिनं लिहिलं, ‘कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे. म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं खूप खूप गोड आहे. भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा’. चिमुकल्या मायराच्या या पोस्टवर अनेक कमेंट येत आहेत.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना भरभरुन प्रेम मिळत असतं. या मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ तर सगळ्यांची आवडती बनली आहे. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे ती कायम चर्चेत असते. मायराचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे ती नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. ती वेगेवेगळ्या थीमवर फोटो, व्हिडीओ बनवते.
दरम्यान, मायरा अनेकवेळा तिच्या आई-वडिलांसोबत ट्विनिंग करुन फोटो शेअर करते. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळतं. मायरानं अगदी कमी कालावधीत तिच्या अभिनयानं आणि निरागसतेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.