JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / हत्या की आत्महत्या? CBI पोहोचली सुशांतच्या घरी, मृत्यूनंतरचे ते तास करणार रिक्रिएट

हत्या की आत्महत्या? CBI पोहोचली सुशांतच्या घरी, मृत्यूनंतरचे ते तास करणार रिक्रिएट

सुशांतच्या मृत्यूच्या वेळी घरात उपस्थित त्याच्या मित्रांनी त्याला पहिल्यांदा पाहिलं होतं, त्यामुळे तपासासाठी आज पुन्हा सुशांतच्या मृत्यूचा दिवस रिक्रिएट करण्यात येईल.

0105

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh Rajput) प्रकरणाचा मोर्चा आता CBI ने सांभाळला आहे. सुशांतची आत्महत्या झाली की हत्या याचा शोध घेण्यासाठी सीबीआयच्या टीमने मुंबईतील अनेक लोकांशी बातचीत केली.

जाहिरात
0205

सीबीआयची टीम एक एक पैलूंचा अगदी तपशीलवार तपास करीत आहेत. संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी सीबीआयची टीम सुशांतच्या वांद्रे येथील घरी पोहोचली आहे.

जाहिरात
0305

येथे ते घटना रिक्रिएट करील पुराव्यांशी तपासून पाहतील. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेकांनी व्हिडीओ करीत त्याने आत्महत्या केली नसल्याचा दावा केला होता. यामध्ये त्याची उंची आणि घराच्या उंचीशी ताळमेळ नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. बेडपासून फॅनपर्यंतची उंची सुशांतच्या उंचीच्या जवळपास असल्याने तो आत्महत्या करू शकत नसल्याचा अनेकांचा दावा आहे.

जाहिरात
0405

सुशांतच्या मृत्यूच्यावेळी उपस्थित चारजणांसोबत सीबीआय पुन्हा क्राइम सीन रिक्रिएट करतील. सुशांत दार उघडत नसल्याने चारही जणांनी काय केलं आदी बाबी पुन्हा रिक्रिएट करण्यात येतील.

जाहिरात
0505

यावेळी सीबीआयच्या टीमसोबत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पीठानीदेखील आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या