JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीचा नाझीला नताशीसोबत झाला Break Up; 'या' कारणामुळे होतेय चर्चा

Munawar Faruqui: मुनव्वर फारुकीचा नाझीला नताशीसोबत झाला Break Up; 'या' कारणामुळे होतेय चर्चा

एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी प्रचंड चर्चेत आला होता. तो या शोचा विजेतादेखील ठरला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 सप्टेंबर-   एकता कपूरच्या ‘लॉक अप’ या रिऍलिटी शोमधून स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी प्रचंड चर्चेत आला होता. तो या शोचा विजेतादेखील ठरला होता. व्यावसायिक आयुष्यासोबतच मुनव्वर आपल्या खाजगी आयुष्यामुळेदेखील चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुनव्वर चर्चेत आला आहे. लॉक अपमधून बाहेर आल्यानंतर मुनव्वरने आपण सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर नाझीला नताशाला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. लॉक अपच्या सक्सेस पार्टीतसुद्धा तो नाझीलासोबत सहभागी झाला होता. परंतु आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं वृत्त समोर येत आहे. स्टॅन्डअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या खाजगी आयुष्याबाबत सतत काही ना काही समोर येत आहे. दरम्यान त्याने सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर नाझिलासोबतचं नातं संपुष्टात आणल्याचं वृत्त आहे. दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपलं नातं ऑफिशियल केलं होतं. त्यानंतर बऱ्याचवेळा ते मुंबईत एकत्र हँग आउट करताना दिसून आले होते. ‘हलकी सी बरसात’ या म्युझिक व्हिडिओमध्येही त्यांनी एकत्र काम केलं होतं. मुनव्वर हा एकता कपूरच्या ‘लॉक अप’ शोचा विजेता आहे. रिऍलिटी शो दरम्यान, त्याने खुलासा केला होता की, तो विवाहित आहे. आणि त्याला एक मूलदेखील आहे.याबाबत त्याने सांगितलं होतं की, दोघेही न्यायालयात कायदेशीर लढा देत असल्याने एक वर्षाहून अधिक काळ ते विभक्त राहात आहेत. नंतर त्याने नाझिलासोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. याआधी लॉकअपमध्ये त्याची सह-स्पर्धक अंजली अरोरासोबत जवळीकता वाढली होती. त्यामुळे सतत चर्चेत असायचा परंतु अचानक त्याने लग्न आणि गर्लफ्रेंडबाबत खुलासे करत खळबळ माजवली होती. **(हे वाचा:** Karan Johar: रिलेशनशिपमध्ये होता करण जोहर; पहिल्यांदाच व्यक्त केलं ब्रेकअपचं दुःख ) बॉम्बे टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मुनव्वर आणि नाझिलाचं नुकतंच काही कारणास्तव ब्रेकअप झालं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आता इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. या रिपोर्टमध्ये स्टँड-अप कॉमेडियनने त्यांच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करण्यास नकार दिल्याचा दावाही केला आहे. ‘लॉक अप’ नंतर मुनव्वरने नाझीलासोबतचं नातं ऑफिशियल करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर ही जोडी प्रचंड चर्चेत आली होती. त्यांचे अनेक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या