JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / महेश मांजरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अटक टळली, काय आहे नेमकं प्रकरण

महेश मांजरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, अटक टळली, काय आहे नेमकं प्रकरण

अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सध्या त्यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या चित्रपटामुळे कायदेशीर बाबींत अडकले आहेत. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) आहे.

जाहिरात

Mahesh Manjrekar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,2 मार्च-   अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर   (Mahesh Manjrekar)  सध्या त्यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’   (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha)   या चित्रपटामुळे कायदेशीर बाबींत अडकले आहेत. हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात  (Bombay High Court)  आहे. नुकताच न्यायालयाने महेश मांजरेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर, मुंबई हायकोर्टाने महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांविरुद्ध अटक करण्यासारख्या बाबींना थांबवलं आहे. म्हणजेच सध्या त्यांची अटक टळली आहे. एका विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर माहीम पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. भारतीय स्त्री शक्ती या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशपांडे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या ‘नाय वरन भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांवर अश्लील दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. असे आरोप करत हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले होते. पत्रात, NCW प्रमुखांनी ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक सुस्पष्ट सामग्रीच्या उघड प्रसारावर’ बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर असे नमूद केले आहे की महेश मांजरेकर यांनी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्री दर्शविली आहे. त्यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांमध्ये आपत्तीजनक दृश्ये दाखविण्यात आली आहेत. आपल्या विरुद्ध खटला दाखल झाल्यानंतर, महेश मांजरेकर आणि दोन निर्मात्यांनी तपासाला सहकार्य करूअसे सांगून, अटकेपासून किंवा कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून अंतरिम संरक्षणाची मागणी केली होती. गुन्ह्याची नोंद- पोलिसांनी महेश मांजेरकर आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 34, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) कलम 14 आणि आयटी कायद्याच्या कलम 67, 67B अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या