JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: एक बॅकग्राऊंड डान्सर कशी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा मौनी रॉयचा अनोखा प्रवास

HBD: एक बॅकग्राऊंड डान्सर कशी बनली प्रसिद्ध अभिनेत्री; वाचा मौनी रॉयचा अनोखा प्रवास

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून मौनी रॉयला ओळखलं जातं.आपल्या अभिनयासोबतचं मौनी आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. मौनी छोट्या पडद्यावरील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज ही अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी.

0106

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून मौनी रॉयला ओळखलं जातं.आपल्या अभिनयासोबतचं मौनी आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. मौनी छोट्या पडद्यावरील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज ही अभिनेत्री आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी.

जाहिरात
0206

अभिनेत्री मौनी रॉय आज एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मात्र हे यश तिला इतक्या सहजासहजी मिळालेलं नाहीय. या अभिनेत्रीने अनेक कष्ट घेत हे यश संपादन केलं आहे. मौनीने एक बॅकग्राऊंड डान्सर ते प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास केला आहे.

जाहिरात
0306

मौनी रॉयचा ही मूळची पश्चिम बंगालची आहे. तिचा जन्म २८ सप्टेंबर १९८५ मध्ये कूच पश्चिम बंगाल येथे झाला होता. तिने बिहारच्या एका शाळेत आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं. तर दिल्लीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आहे. इतकंच नव्हे तर तिने मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली आहे.

जाहिरात
0406

फार कमी लोकांना माहिती आहे, की मौनीने सर्वात प्रथम एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून आपलं करिअर सुरु केलं होतं. अभिनेता अभिषेक बच्चन आणि भूमिका चावला यांच्या 'रन' या चित्रपटातील एका गाण्यात मौनीने बॅकग्राऊंडला डान्स केलं होत.

जाहिरात
0506

या चित्रपटात डान्सर म्हणून काम केल्यानंतर मौनीने छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला होता. तिला २००७ मध्ये एकता कपूरच्या 'कभी सास भी बहू थी' या मालिकेत पहिला ब्रेक मिळाला होता.त्यांनतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. मात्र तिला खरी ओळख 'देवों के देव महादेव' आणि 'नागीन' या मालिकांमधून मिळाली.

जाहिरात
0606

मौनीने अक्षय कुमारच्या 'गोल्ड' या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ती लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या