तर या तरुणीनं भारतासाठी केला असता विक्रम; थोडक्यात गमावला मिस युनिव्हर्सचा ताज
बहुचर्चित, बहुप्रतिक्षित मिस युनिव्हर्स (Miss Universe 2020) ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली.
यंदाचं या स्पर्धेचं हे 69 वं वर्ष होतं. या स्पर्धेत मेक्सिकोच्या अँड्रा मेझा (Andrea Meza) हिनं बाजी मारली आहे.
लक्षवेधी बाब म्हणजे अंतिम फेरीपर्यंत तिनं धडक मारली होती. या फेरीत तिच्यासमोर ब्राझिलची जुलिया गामा (Julia Gama), पेरुची जॅनक मसिट (Janick Maceta) आणि मेक्सिकोची अँड्रा मेझा (Andrea Meza) यांचं आव्हान होतं.
तिनं या सौंदर्यवतींना जोरदार टक्कर दिली. परंतु अंतिम फेरीत तिच्याकडून एक लहानशी चूक झाली त्यामुळं तिनं मिस युनिव्हर्सचा ताज गमावला.
अंतिम फेरीत तिला फ्रिडम ऑफ स्पिच म्हणजे काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिनं महिलांचं उदाहरण देत उत्तर दिलं. परंतु तिचं उत्तर अँड्राच्या तुलनेत प्रभावी नव्हतं.
परिणामी परिक्षकांकडून तिला चांगले गुण मिळू शकले नाही. अन् विजेता होण्याचा मान अँड्रा हिला मिळाला.
जर एडलिननं मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला असता तर असा विक्रम करणारी ती भारताची तीसरी सौंदर्यवती ठरली असती. यापूर्वी लारा दत्ता आणि सुष्मिता सेन यांनी ही स्पर्धा जिंकली आहे.
जर एडलिननं मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला असता तर असा विक्रम करणारी ती भारताची तीसरी सौंदर्यवती ठरली असती. यापूर्वी लारा दत्ता आणि सुष्मिता सेन यांनी ही स्पर्धा जिंकली आहे.