JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘बॉलिवूड होती एक मोठी चूक’; मिनिशा लांबाला व्हायचं होतं पत्रकार झाली अभिनेत्री

‘बॉलिवूड होती एक मोठी चूक’; मिनिशा लांबाला व्हायचं होतं पत्रकार झाली अभिनेत्री

व्हायचं होतं पत्रकार पण झाली अभिनेत्री; मिनिशा लांबा म्हणते.. बॉलिवूडमध्ये जाणं होती एक मोठी चूक

0110

एकेकाळी मिनिशा लांबा ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. खरं तर तिला अभिनयात फारशी गती नव्हती पण तिच्या ग्लॅमरस आणि मादक अदा पाहून चाहते घायाळ होत असतं. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0210

तिनं 2005 ते 2014 असा दिर्घ काळ बॉलिवूडमध्ये संघर्ष केला. परंतु तरी देखील तिच्या वाट्याला म्हणावे तसे सुपरहिट चित्रपट आले नाहीत. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0310

प्लॉप चित्रपटांमुळं तिच्यावर फ्लॉप अभिनेत्रीचा शिक्का मारण्यात आला. तिला काम मिळानासं झालं परिणामी तिनं बॉलिवूड पासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0410

मात्र बॉलिवूडमध्ये येणंच एक मोठी चूक होती असं मिनिषा अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0510

सध्या ती आपल्या कुटुंबासमवेत दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी भागात राहत आहे. मिनिषाला चर्चेत राहणे आवडत नाही, म्हणूनच तिने इंडस्ट्रीपासून मर्यादित अंतर बाळगलं आहे. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0610

खरं तर तिला अभिनेत्री नव्हे एक पत्रकार व्हायचं होतं. या क्षेत्रात काम करण्यासाठी तिनं आपल्या इंग्रजी भाषेवरही भरपूर मेहनत घेतली होती. परंतु तिनं एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलं अन् करिअरला वेगळंच वळण मिळालं. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0710

सौंदर्य स्पर्धांमुळं तिला जाहिरातींमध्ये काम करण्याच्या ऑफर्स मिळू लागल्या. अशाच एका जाहिराती दरम्यान तिला शूजित सरकार यांच्या ‘यँहा’ चित्रपटाची ऑफर मिळाली. अन् तिथूनच तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0810

मिनिषा लांबाची कारकीर्द हवी तशी बहरली नाही. तिनं ‘कॉर्पोरेट’, ‘रॉकी द रिबेल’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियां’, ‘बचना ए हसीनो’, ‘किडनॅप’, ‘जिला गाझियाबाद’, ‘भूमी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
0910

परंतु यापैकी कुठल्याच चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाल केली नाही. परिणामी फ्लॉप चित्रपटांना वैतागून अखेर तिनं बॉलिवूड पासून दूर राहणंच पसंत केलं. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
1010

परिणामी आपण अभिनयाऐवजी पत्रकारीकाच करायला हवी होती किमान त्यात अधिक यश मिळालं असतं असं मिनिशाला अनेकदा वाटतं. असं ती मुलाखतीत म्हणाली होती. (Minissha Lamba/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या