सिनेमामुळे तो जेवढा सोशल मीडियावर चर्चेत आहे तेवढाच तो त्याच्या मुलीच्या नावानेही चर्चेत आहे. क्रिशने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं आहे.
मार्वलच्या सिनेमांमध्ये सुपरहिरो थोरची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या क्रिश हेम्सवर्थचा मेन इन ब्लॅक- इंटरनॅशनल सिनेमा १४ जूनला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो सध्या व्यग्र आहे. या सिनेमामुळे तो जेवढा सोशल मीडियावर चर्चेत आहे तेवढाच तो त्याच्या मुलीच्या नावानेही चर्चेत आहे. क्रिशने त्याच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलं आहे.
आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत क्रिशने मुलीचं नाव इंडिया ठेवण्याचं कारण पत्नी एल्सा पातकी असल्याचं म्हटलं. तो म्हणाला, ‘माझी पत्नी काही काळ भारतात राहिली होती. याचमुळे तिने मुलीचं नाव इंडिया ठेवलं.’
क्रिसने मुलीचं नाव इंडिया ठेवण्यासोबतच त्याच्या मनातही भारतासाठी विशेष स्थान आहे. भारतात चित्रीकरण करण्याचा त्याचा अनुभव भीतीदायक असला तरी त्याला मजा आली. चित्रीकरणादरम्यान त्याला तो रॉकस्टार असल्यासारखंच वाटत होतं.
गेल्यावर्षी नेटफ्लिक्सच्या ढाका प्रोजेक्टसाठी क्रिश भारतात आला होता. त्याने अहमदाबाद आणि मुंबईमध्ये चित्रीकरण केलं.
क्रिस म्हणाला की, ‘दिग्दर्शकाच्या प्रत्येक कटनंतर चाहते जोरजोरात ओरडायचे. आम्हाला तेव्हा रॉकस्टार असल्यासारखं वाटत होतं. लोक ज्या पद्धतीने आमचा जयजयकार करायचे ते पाहून आम्हालाही आनंद झाला.’
मुलाखतीदरम्यान क्रिसला बॉलिवूडमध्ये काम करणार का असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने, ‘माझं याबाबत बोलणी सुरू होती. कदाचित मी काम करूही शकेन.’ क्रिस मेन इन ब्लॅक सीरिजच्या मेन इन ब्लॅक- इंटरनॅशनलमध्ये काम करण्यास फार उत्सुक होता. हा सिनेमा भारतात हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.