JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माझ्याशी लग्न करणार का?', अभिनेत्रीनं पोस्ट व्हायरल होताच केली Delete

माझ्याशी लग्न करणार का?', अभिनेत्रीनं पोस्ट व्हायरल होताच केली Delete

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोशल मीडियावर सतत तिच्या हॉट लुकमुळे चर्चेत असते. सध्या ती माझ्याशी लग्न करणार का..या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 फेब्रुवारी- माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव (ruchira jadhav ) सोशल मीडियावर तिच्या हॉट लुकसाठी नेहमी चर्चेत असते. रुचिराचा लवकरच लकडाऊन बी पॉजिटीव्ह हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. मात्र याहीपेक्षा सध्या रुचिराच्या एका पोस्टनं सर्वांचे लक्षवेधून घेतलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. रुचिरानं मात्र ही पोस्ट (ruchira jadhav latest post ) व्हायरल होताच डिलीट देखील केली आहे. मात्र तिनं असं नेमकं काय लिहिलं होतं या पोस्टमध्ये ज्यामुळे ती चर्चेत आली. रुचिरानं इन्स्टा पोस्ट करत म्हटलं होतं की, ‘Will you marry me?’ ..म्हणजेच माझ्याशी लग्न करणार का?..तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेकांना हा प्रमोशनचा भाग वाटला होता. तर काहींनी कलाकार मंडळी नाटकाचा किंवा चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अशा प्रकारे सोशिअल मीडियावर पोस्ट करत असल्याचे अंदाज बांधले होते. मात्र या सगळ्या प्रकारानंतर काहीवेळातच रुचिराने आपली पोस्ट डिलीट केली व याबद्दल माहिती दिली.

रुचिरा नं दुसरी इन्स्टा पोस्ट करत म्हटलं की, मी काही वेळापूर्वी केलेली पोस्ट डिलीट केली आहे . हे फक्त एक ‘धाडस’ ( Dare) होतं जे मी करण्याचं स्वीकारलं… तुम्हाला असा त्रास दिल्याबद्दल मी तुमची माफी मागते’… असे म्हणत अभिनेत्री रुचिरा जाधव हिने डिलीट केलेल्या पोस्टबद्दल हा खुलासा केला आहे. तिनं तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनासाठी ही केलं असल्याचा म्हटलं आहे. लकडाऊन बी पॉजिटीव्ह या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, अंकुशी चौधरी यांच्या भूमिका आहेत. रुचिरा देखील याचा भाग आहे.

संबंधित बातम्या

रुचिरानं कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तुझ्या वाचून करमेना’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. बे दुणे दहा, माझे पती सौभाग्यवती, प्रेम हे अशा मालिकांमध्ये तिनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या