JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सिम्मी आंटीची छोट्या परीने केली हुबेहूब मिमिक्री, Video Viral

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील सिम्मी आंटीची छोट्या परीने केली हुबेहूब मिमिक्री, Video Viral

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील छोटी परी फेम मायरा अभिनयासोबत उत्तम डान्स व सेटवरील अनेक कलाकरांची मिमिक्री देखील करताना दिसते. आता तिचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी - झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’  (mazi tuzi reshimgath)  ही मालिका फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे एकत्र दिसत आहेत. या मालिकेत नेहा कामतची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे साकारते आहे. तर बालकलाकार मायरा  (pari fame mayra)  म्हणजे सर्वांच्या लाडक्या छोट्या परीच्या अभिनयाची देखील खुप चर्चा रंगली आहे. मालिकेतील तिचा निरागस अभिनय सर्वांचीच मनं जिंकतोय. श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. मायरा ही सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडीओज चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. मायरा अभिनयासोबत उत्तम डान्स व सेटवरील अनेक कलाकरांची मिमिक्री देखील करताना दिसते. मायराच्या इन्स्टाला नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती मालिकेतील सिम्मी.. आंटीची चांगलीच मिमिक्री करताना दिसतेय. अगदी तिच्या स्टाईलमध्ये मानेला झटका देत पप्पा… असं म्हणताना दिसत आहे. सिम्मी आंटीसोबत मिळून तिनं ही मिमिक्री केली आहे. वाचा- Aai Kuthe Kay Karte : आता निघायची वेळ झाली…कसं करमणार? अरुंधती असं का म्हणाली? सिम्मीचा हा डायलॉग जेवढा मालिकेत प्रसिद्द झाला नसेल तितका मायराच्या मिमिक्रीमुळे लोकप्रिय झाला आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांने हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत तर काहींनी फनी कमेंट देखील केल्या आहेत. यापूर्वी मायरा अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची कॉपी करताना दिसली आहे. त्याच्यासोबत देखील एक व्हिडिओ तिनं नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

संबंधित बातम्या

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सर्वांचेच लक्ष वेधून घेते आहे. तिची निरागसता, बोलण्यातील साधेपणा आणि हसणे, मुरडणे, रुसणे पाहायला खूपच मजा येते. तिचा अभिनय देखील अप्रतिम आहे. खरेतर या मालिकेआधी देखील तिचे अनेक चाहते होते. मायरा वायकुळचे. इन्स्टाग्रामवरही खूप फॉलोअर्स आहेत. युट्युबवर Myra’s corner World Of Myra and Family आणि नावाने मायराचे चॅनेल देखील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या