ravi jadhav
मुंबई, 25 सप्टेंबर : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव त्यांच्या चित्रपटांमुळे कायमच चर्चेत आले आहेत. अशातच ते पुन्हा एकदा त्यांच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आलेत. रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलंय. नटरंग, बालक पालक, मित्रा, बालगंधर्व, न्यूड यांसारख्या वैविध्यपूर्ण विषयांवर रवी जाधव यांनी चित्रपट बनवले आहेत. आइडेंटिटी पासून सेक्शुअलिटी पर्यंत, महत्वपूर्ण सामाजिक विषयांवरील त्यांच्या मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषीके प्राप्त झाली आहेत. आता यात इक्वालिटीचा सध्याचा महत्वाचा विषयाची भर पडणार आहे. ते लवकरच हिंदी वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. त्यांच्या या हिंदी वेब सिरीजचं नाव ‘गौरी सावंत’ आहे. रवी जाधव यांनी नव्या हिंदी वेब सिरीजविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीये. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘आतापर्यंतचा माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक विषय माझ्या आगामी हिंदी वेबसिरीजच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण सध्या पुण्यात सुरु असून लवकरच ती मालिका आपल्या भेटीला येईल’.
रवी जाधवच्या या नव्या विषयासाठी आणि त्यांच्या हिंदी वेब सिरिजसाठी चाहते बरेच उत्सुक आहेत. पोस्टवर अनेक कमेंट करत आहेत. याशिवाय त्यांच्या नव्या प्रोजेक्टसाठी भरभरुन शुभेच्छाही देत आहेत. रवी जाधव चित्रपट दिग्दर्शन, निर्मितीच्या बरोबरीने चित्रपट प्रस्तुतीच्या क्षेत्रातदेखील कार्यरत आहेत.