JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / TRP रेसमध्ये ही मालिका ठरली नंबर 1! तर 'या' मालिका झाल्या टॉप 10 मधून OUT

TRP रेसमध्ये ही मालिका ठरली नंबर 1! तर 'या' मालिका झाल्या टॉप 10 मधून OUT

मराठी मालिकांचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. पाहूया कोणत्या मालिकेने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.

0111

प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि टीआरपी रेसमध्ये पहिला क्रमांक गाठण्यासाठी मेकर्स नवनवीन ट्विस्ट आणत असतात. काही वेळा ते यामध्ये यशस्वी होतात तर काही वेळा हा डाव फसतो आणि मालिकेचा टीआरपी खाली घसरतो. आज पुन्हा एकदा मराठी मालिकांचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. पाहूया कोणत्या मालिकेने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.

जाहिरात
0211

आपण दहाव्या क्रमांकापासून पाहूया. गेल्या आठवड्यात नवव्या क्रमांकावर असलेली झी मराठीवरील मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' या आठवड्यात दहाव्या स्थानावर आहे.

जाहिरात
0311

तर गेल्यावेळी टॉप 10 मध्ये जागा न मिळवू शकलेली मालिका 'स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा' या आठवड्यात नवव्या स्थानावर आली आहे.

जाहिरात
0411

आणखी एका मालिकेने या आठवड्यात टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे. ती मालिका म्हणजे स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' होय. सध्या हि मालिका आठव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0511

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. ही मालिका आठव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर आली आहे.

जाहिरात
0611

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेने सुद्धा सातव्यावरून सहावा क्रमांक पटकावला आहे.

जाहिरात
0711

तर 'मुलगी झाली हो' ही मालिका गेल्या दोन आठवड्यांप्रमाणे पाचव्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
0811

'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मालिका आपल्या दुसऱ्या स्थानावर घसरून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.

जाहिरात
0911

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका या आठवड्यातही तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जाहिरात
1011

यावेळी दुसरा क्रमांक 'स्टार प्रवाह धुमधडाका 2022' ने पटकावला आहे.

जाहिरात
1111

तर गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.सहकुटुंब सहपरिवार आणि देवमाणूस या मालिकांना टॉप10 मध्ये यावेळी जागा मिळू शकली नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या