‘आई कुठे काय करते?’ (Aai kuthe kay karate) फेम संजना म्हणजेच रुपाली भोसलेचा (Rupali bhosle) हा लूक तुम्हाला आवडतोय का पाहा.
'आई कुठे काय करते?' फेम संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतंच आपलं बोल्ड फोटोशूट केला आहे. या फोटोंवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
रुपाली ही मराठी अभिनय सृष्टीतील एक ओळखीचं नाव आहे. रुपाली आपल्या अभिनयासोबतच आपल्या स्टाईलमुळे सुद्धा चर्चेत असते.
रुपाली भोसले बिग बॉस मराठीमुळेसुद्धा खूपच प्रसिद्धीत आली होती. यात रुपालीला प्रेक्षकांनी चांगली पसंती दर्शवली होती.
रुपाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत असते.
नुकतंच रुपालीने स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःलाच एक कार गिफ्ट केली होती आणि तिचे फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते.
रुपालीने मराठीसोबतच 'बडी दुरसे आये है' या हिंदी मालिकेतसुद्धा काम केलं आहे. त्यात अभिनेता सुमित राघवन तिच्या जोडीला होता.
रुपालीने दिल्या घरी तू सुखी राहा, गोजिरवाण्या घरात, कन्यादान अशा अनेक मराठी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
रुपाली सध्या 'आई कुठे काय करते?' या मराठी मालिकेमध्ये 'संजना' ही भूमिका साकारत आहे.