मुंबई, 13 जानेवारी- महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) ‘बिग बॉस मराठी’मधून फ्री झाल्यानंतर आता आपल्या चित्रपटासोबत भेटीला येत आहेत. लवकरच महेश मांजरेकरांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Nay Varanbhat Loncha Kon Nay Koncha) हा आगामी चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. नुकतंच या चित्रपटातचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. परंतु आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसत आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात आहे. इतकंच नव्हे तर राष्ट्रीय महिला अयोगाने आक्षेप घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. महेश मांजरेकर यांनी आजपर्यंत अनेक विषयांवर चित्रपट बनवले आहेत. यावेळीही ते एका वेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचं नाव पाहूनच प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट येत्या 14 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यामध्ये काही भडक दृश्ये दाखवण्यात आली होती. ट्रेलर पहिल्यापासून सोशल मीडियावर या भडक दृश्यांची चर्चा रंगली होती. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने या दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. या ट्रेलरमध्ये एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाला आक्षेपार्ह अवस्थेत दाखवण्यात आलं आहे.
महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं होतं, ‘माणसाच्या मुखवट्यामागं लपली आहेत जनावरं… काँक्रीटच्या जंगलात माणुसकीचे लचके तोडायला येत आहे…. ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’. ही पोस्ट पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी फारच उत्सुक झाले आहेत. (हे वाचा: ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीच्या रिअल लाईफ लेकीला पाहिलंत का? आहे फारच क्युट ) परंतु या चित्रपटावर आक्षेप घेतला जात असूसुद्धा महेश मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम असलेले दिसून येत आहेत. कारण त्यांनी काही तासांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये असं लिहिलं आहे, ’ ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ वर होऊन जाऊदे राडा. कारण 14 जानेवारीला सुरु होणार लांडग्यांचा हैदोस,तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात’.