मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी शुक्रवारी 17 डिसेंबर 2021 रोजी विवाहबद्ध झाला आहे. अभिषेक गुणाजी त्याची खास मैत्रीण राधा पाटील हिच्यासोबत विवाहबद्ध झाला आहे.
मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी शुक्रवारी 17 डिसेंबर 2021 रोजी विवाहबद्ध झाला आहे. अभिषेक गुणाजी त्याची खास मैत्रीण राधा पाटील हिच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल गाव येथील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात विवाहबद्ध झाला आहे. राजश्री मराठीने यांच्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. (फोटो साभार- rajshrimarathi insta पेज)
अभिषेक आणि राधाच्या लग्नाला त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना बोलावले होते. यात सुबोध भावेची पत्नी मंजिरी भावे आणि त्यांची दोन्ही मुलं या लग्नाला उपस्थित राहिले होते.(फोटो साभार- rajshrimarathi insta पेज)
हे ठिकाण निवडण्यामागचं काही खास खरं आहे. मिलिंद गुणाजी हे निसर्गप्रेमी आहेत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आपल्या मुलाचे लग्न निसर्गाच्या सानिध्यात व्हावे अशी त्यांची ईच्छा होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गावच्या मंदिरात अगदी पारंपरिक आणि तितक्याच साध्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलाचे लग्न लावण्याचे ठरवले.
मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी हे दोघेही अभिनय क्षेत्रातील कलाकार म्हणून ओळखले जातात तर अभिषेक गुणाजी हा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो.
लग्नाच्या दिवशीच राधा आणि अभिषेक यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला. लक्ष्मीनारायण मंदिरात अगदी साध्या पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली.
दोन आठवड्यापूर्वी अभिषेक गुणाजी आणि राधा पाटील यांची एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.