JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / जुन्या मराठी मालिका घेणार एक्झिट; तर 'या' 5 नव्या मालिकांची होणार एन्ट्री!

जुन्या मराठी मालिका घेणार एक्झिट; तर 'या' 5 नव्या मालिकांची होणार एन्ट्री!

झी मराठीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नव्या मालिका एन्ट्री करणार आहेत.

0106

झी मराठीवर नव्या मालिकांचं जणू पेवचं फुटलं आहे. या काही दिवसांत अनेक नव्या मालिकांचे प्रोमो आपल्याला पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे चाहते उस्तुक झाले आहेत. तर आपल्या कोणत्या लाडक्या मालिका निरोप घेणार यांची रुखरुखही लागली आहे. मात्र झी मराठीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नव्या मालिका एन्ट्री करणार

जाहिरात
0206

30 ऑगस्टपासून रात्री 9 वाजता 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहूनचं चाहते खुश झाले आहेत. मालिकेमध्ये अभिनेत्री अमृता पवार मुख्य भूमिकेत आहे. मात्र अभिनेता कोण असणार याबद्दल खुलासा झालेला नाहीय.

जाहिरात
0306

लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे पुन्हा नव्या मालिकेसह आपल्या भेटीला आली आहे. 30 ऑगस्टपासून संध्याकाळी 7.30 वाजता 'मन उडु उडु झालं' या झी वरच्या मालिकेत ती आपल्याला दिसणार आहे. यामध्ये 'विठूमाऊली' फेम अभिनेता अथर्व राऊतसुद्धा दिसणार आहे.

जाहिरात
0406

तर संध्याकाळी 7 वाजता 'मन झालं बाजिंद' ही मालिकासुद्धा येणार आहे. यामध्ये गावाकडील पार्श्वभूमीवर आधारित कथा पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
0506

तसेच 16 ऑगस्टपासून रात्री 10.30 वाजता 'ती परत आलीये' ही गूढ मालिका आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'देवमाणूस' ही मालिका आपला निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.

जाहिरात
0606

तर रात्री 8.30 वाजता 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता श्रेयश तळपदे खूप वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या