सोनालीने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये नोकरी करणाऱ्या कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केल आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लग्नानंतर सतत विदेशवारी करत आहे. सोनाली आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.
सोनाली सध्या मालदीवमधून पतीसोबत सुंदर फोटो सोशल मीडियावर शेयर करत आहे. हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होतं आहेत.
सोनाली आणि कुणाल एकेमेकांसोबत खुपचं एन्जॉयदेखील करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या कपलची जोरदार चर्चा सुरु आहे.
चाहत्यांना सोनाली आणि कुणालची जोडी खुपचं पसंत पडत आहे. शिवाय अनेक कलाकरांनीसुद्धा या जोडीला कमेंट्स करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.