सध्या मराठी वेबसीरिज ‘रानबाजार’ प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मराठी नायिका पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसून आल्या आहेत.
सध्या मराठी वेबसीरिज 'रानबाजार' प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमध्ये मराठी नायिका पहिल्यांदाच इतक्या बोल्ड अंदाजात दिसून आल्या आहेत.
या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, उर्मिला कोठारे , सुरेखा कुडची अशा अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान या सीरिजमध्ये प्राजक्ता माळी फारच वेगळ्या लुकमध्ये दिसून आलीये. या सीरिजसाठी प्राजक्ताने मोठ्या प्रमाणात आपलं वजनदेखील वाढवलं आहे.
प्राजक्ताने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या लुकमधील फरक स्पष्ट दिसून येत आहे.
हा फोटो एक कोलाज आहे. यामध्ये अभिनेत्रीने रानबाजारचा लुक आणि आता वेट लॉसनंतरचा लुक शेअर केला आहे.
सोबतच अभिनेत्रीने 61 वरुन आता आपलं वजन 54 वर आल्याचं सांगितलं आहे. म्हणजे अभिनेत्रीने 7 कि. वजन कमी केलं आहे.