JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ही मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविडची खास; फोटो शेअर केल्याने झाला नात्याचा उलगडा

ही मराठी अभिनेत्री आहे राहुल द्रविडची खास; फोटो शेअर केल्याने झाला नात्याचा उलगडा

क्रिकेटर राहुल द्रविडचा (Rahul Dravid Birthday) आज 49 वा वाढदिवस आहे. यानिमित्त एका मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने राहुल द्रविड सोबतचा आपला फोटो शेअर करत राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी - क्रिकेटर राहुल द्रविडचा (Rahul Dravid Birthday) आज 49 वा वाढदिवस आहे. राहुल द्रविडवर देशभरातून शुभेच्छा वर्षाव होत आहे. यानिमित्त एका मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने राहुल द्रविड सोबतचा आपला फोटो शेअर करत राहुल द्रविडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ( aditi dravid) ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. याला कारणही तसं आहे कारण तिनं राहुल द्रविडसोबतचे तिचं नातं सांगितलं आहे. अभिनेत्री आदिती द्रविड हिनं इन्स्टा पोस्ट करत तिचा राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपण एकाच कुटुंबातील आहोत याचा मला अभिमान आहे. तसेच, मला माझे आडनाव खूप आवडते, मी ते कधीही बदलणार नाही. आयुष्यभर प्रेम आणि आदर! तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला राहुल द्रविडसोबतच नाते काय आहे असं विचारले आहे. तिच्या या पोस्टवर अभिनेता निखिल चव्हाण याने देखील कमेंट करत म्हटलं आहे की, काक…चुलते. याशिवाय आदिने देखील काही कमेंटना रिप्लाय देत ..काका असं उत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या

आदिती सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत नंदिनीची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे कौतुक होत आहे. यापूर्वी अदितीने झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. वाचा- Aai Kuthe Kay Karte : आता निघायची वेळ झाली…कसं करमणार? अरुंधती असं का म्हणाली? अदिती आणि रसिका सुनील या दोघी चांगली मैत्रिणी देखील आहेत. या दोघींनी मिळून “यु अँड मी” हे व्हिडिओ सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. अदिती अभिनयासोबतच गीतकार देखील आहे. तिने लिहिलेलं गाणं तिच्या ‘झिलमिल’ या अल्बमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. स्टार प्रवाहवरील ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर -महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतून तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची थोरली बहीण तुळसाची भूमिका साकारली होती. आदिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. यासोबत तिनं यापूर्वी कपिल देव यांच्यासोबतचा तिचा एक बालपणीचा फोटो देखील शेअर केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या